Pune News : अरुंद पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सायंकाळी गर्दीमुळे अपघाताचा धोका

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील स्थिती
pune nanded phata bridge encroached by street food sellers accident possibility
pune nanded phata bridge encroached by street food sellers accident possibilitysakal

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील अरुंद पुलावर मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांनी अतिक्रमण करत भाजीपाला व इतर वस्तू विक्रीची दुकाने थाटली आहेत. दररोज सायंकाळी पुलावर विक्रेत्यांचे टेंपो, हातगाड्या थांबत असल्याने व खरेदी करणारांचीही वाहने थांबत असल्याने वाहतुककोंडी होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

नांदेड फाट्याजवळील पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीवर व कालव्यावर अरुंद पुल आहे. स्थानिक नागरिक, नोकरदार , पर्यटक व सिंहगड, पानशेत भागातील नागरिगांच्या वाहनांची येथून नेहमी वर्दळ असते.

मागील काही दिवसांपासून या वर्दळीच्या ठिकाणी अरुंद पुलावर दहा ते बारा फेरीवाले सायंकाळी टेंपो व हातगाड्या उभ्या करुन भाजीपाला व इतर वस्तू विक्री करण्यासाठी थांबत असल्याने पुण्याकडून खडकवासला बाजूकडे जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

तसेच भाजीपाला खरेदीसाठी काही नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने अडथळ्यात भर पडत आहे.

"अगोदरच रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधार असतो. भाजी विक्रेते थांबत असल्याने दररोज सायंकाळी कामावरुन घरी येताना त्रास होत आहे."

- योगिता बागणीकर, नोकरदार.

"विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने इतर वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज येथील विक्रेत्यांमध्ये वाढ होत असून पूलावर मंडई तयार झाली आहे. प्रशासनाने कारवाई करायला हवी."

-राजेश जाधव, नागरिक,किरकटवाडी.

"आम्ही सातत्याने कारवाया करत आहोत. अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचे टेंपो जप्त करण्यात येत असून वीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नांदेड फाट्याजवळील या विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे."

- धम्मानंद गायकवाड, अतिक्रमण निरीक्षक, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com