पुणे- नाशिक महामार्गावर प्रवाशांचे पुन्हा हाल

khed road
khed road

राजगुरूनगर (पुणे) : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे- नाशिक महामार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आल्याचे पाहावयास मिळत आहे. घाटातच वाहने बंद पडल्यामुळे पुणे- नाशिक महामार्गावर खेड घाटात आज (ता. ५) सकाळीच वाहतूक कोंडी होऊन दोन- दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. खेड घाटामध्ये दोन- दोन तास अडकून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली.

खेड घाटामध्ये वरच्या बाजूने दुसर्‍या वळणावर आज पहाटे ५ वाजता एक ट्रक कलंडला. त्याबाजूला खोल दरी आहे, पण बाजूच्याच पत्र्याच्या कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर सकाळीच एका कंटेनरच्या ॲक्सेलचा रॉड तुटल्याने तो वरच्या बाजूच्या पहिल्या वळणावर बंद पडला. तसेच, एक कंटेनर चौथ्या वळणावर पंक्चर झाला. 

त्यामुळे नऊ- दहा वाजता कोंडी व्हायला सुरुवात झाली. मध्येच अडकलेल्या प्रवाशांची अवस्था, ना घर का ना घाट का, अशी झाली. त्यांना पुढेही सरकता येईना आणि मागेही जाता येईना. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून मोठ्या शिकस्तीने बंद पडलेली वाहने बाजूला करून घाट मोकळा केला. साधारण बारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत सुरु झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com