बाप रे! पुण्यात महिन्यात साडेदहा हजार रुग्ण

Pune corona Patient 10500 in month
Pune corona Patient 10500 in month

पुणे : महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात 10 हजार 598 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 44 टक्के (4,738) रुग्ण गेल्या सात दिवसांमध्ये आढळले. रविवारी एका दिवसात 774 रुग्णांची त्यात भर पडली. 

शहरात डिसेंबरपासून रुग्णांची संख्या कमी होत होती. जानेवारीमध्ये ती सर्वांत कमी होती. त्यानंतर आता कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. पुण्यात गेल्या वर्षी 9 मार्चपासून 28 फेब्रुवारीपर्यंत दोन लाख दोन हजार 702 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. शहरात आतापर्यंत 11 लाख 43 हजार 846 नमुने तपासले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात सध्या चार हजार 919 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 261 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर, 545 रुग्णांचे ऑक्सिजनवर उपचार सुरू आहे. कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com