"ज्येष्ठांच्या पासची दरवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करा' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - ""पासच्या दरवाढीतून ज्येष्ठ नागरिकांना वगळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार करून संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करावा,'' अशी सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना सोमवारी केली. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या पाससाठी केलेली दरवाढ रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पाससाठी दरवाढ करण्याचा ठराव 16 ऑगस्ट रोजी मंजूर झाला. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा 450 रुपयांचा पास आता 700 रुपयांना झाला आहे. अन्य पासची दरवाढ 100 ते 200 रुपयांनी झाली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांसाठीची दरवाढ सुमारे 250 रुपयांनी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना; तसेच प्रवासी संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्य आणि केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देत असताना पीएमपी मात्र ज्येष्ठांवर दरवाढ लादत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी इतकी दरवाढ होणार असल्याची कल्पना नव्हती, असे महापौर आणि मोहोळ यांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी पीएमपीला "दरवाढ रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करावा' असे पत्राद्वारे कळविले आहे. 

दरम्यान, गर्दीच्या मार्गावर जनता बस सुरू कराव्यात आणि पासची दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसचे सचिव नरसिंग परदेशी यांनी पीएमपीकडे एका निवेदनाद्वारे सोमवारी केली.

Web Title: pune new pmp Senior Citizens pmp pass