ग्रामस्वच्छतेचा संदेश देत कलशाची मिरवणूक

युनूस तांबोळी
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): लेझीम पारंपारीक खेळातून आरोग्य, कुरूक्षेत्र व ग्रामस्वच्छतेचा संदेश देत भारत माता की जय...हर हर महादेव च्या जयघोषाने कवठे येमाई (ता. शिरूर) येथील महादेव मंदिराच्या कलशाची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई पासून दोन किलोमिटर अंतरावर महादेवाचे मंदिर आहे. घोडनदीच्या तिरावर असणारे हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराची रंगरंगोटी करण्यात येते. या ठिकाणी नेहमीच धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. महादेवाच्या मंदिरावर ग्रामस्थांच्या वतीने कलशारोहन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा गणेशनगर या विद्यार्थ्यांनी या मिरवणूकीत लेझीमचे प्रात्येक्षिके सादर केली. खेळातून आरोग्य, ग्रामस्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी शिकावो, कुरूक्षेत्र, या सारखे देखावे सादर करत प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाला ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मंगल खंडागळे, बाबाजी मेचे, साधना शिंदे, एकनाथ पोटे, संगिता चोधरी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

Web Title: pune new shirur gram swachata student lezim mandir kalash