दिवाळीच्या तीन दिवसांत १० हजार वाहनांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - दसऱ्याच्या दिवशी झालेल्या वाहन खरेदीचा विक्रम दिवाळीतील तीन दिवसांत मोडला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) १६ ते १७ ऑक्‍टोबर या तीन दिवसांत सर्व प्रकारच्या एकूण १० हजार ४०० वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे प्रमाण वाढते. त्यानुसार यंदा दसऱ्याच्या दिवशी पाच हजार ७४१ दुचाकी, दोन हजार ७५ चारचाकी आणि ८७३ प्रवासी व वाहतुकीच्या वाहनांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या दिवशी वाहन खरेदीत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते; मात्र दसऱ्याचा विक्रम दिवाळीने मोडीत काढला. वसुबारस (ता. १६), धनत्रयोदशी (ता. १७) आणि नरकचतुर्दशी (ता. १८) या तीन दिवसांत सर्व प्रकारच्या दहा हजार ४०० वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये दुचाकी वाहने ८ हजार ६८५, चारचाकी वाहने १ हजार १४५ आणि अन्य प्रकारच्या ५७० वाहनांचा समावेश आहे. त्यातून आरटीओला १७ कोटी पाच लाख रुपयांचा महसूल मिळाला.

वाहन नोंदणी झाल्याशिवाय वितरकांनी ग्राहकांना वाहन सुपूर्द करू नये; अन्यथा वितरकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला होता. यामुळे आणि पसंतीचा वाहन क्रमांक मिळावा म्हणून अनेकांनी काही आठवडे आधीपासूनच वाहन नोंदणी करण्यास सुरवात केली होती, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pune news 1000 vehicle registration in diwali