शहरात साडेतेरा हजार मतदारांची नाव नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये शहरातील 13 हजार 506 जणांनी नोंदणी केली.
महिनाभर चाललेल्या या मोहिमेत जिल्ह्यात एकूण 20 हजार 839 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 18 ते 21 वर्षांपर्यंत युवकांच्या नावांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने 1 ते 31 जुलै या कालावधीत ही मोहीम चालवली. तसेच ज्या मतदारांची नावे नाहीत, अशा मतदारांचीही नावे नोंदणी करण्यात येत होती. यामध्ये नावात बदल, पत्ता बदलणे आणि दुबार मतदारांची नावे वगळणे इत्यादी संदर्भातील एकूण 23 हजार 894 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत.

मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी सर्वाधिक अर्ज हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून आले आहेत. या मतदारसंघातून 2 हजार 502 अर्ज नाव नोंदणीसाठी आले आहेत. त्याखालोखाल मावळ विधानसभा मतदारसंघातून 560 अर्ज आले. खडकवासला मतदारसंघातून 537, भोसरी 438, कसबा पेठ 255, शिवाजीनगर 384, शिरूर 414 व आंबेगाव मतदारसंघातून 513 अर्ज नाव नोंदणीसाठी आले होते.

Web Title: pune news 13500 voter registration