इंधनासाठी दीड कोटीचा चुराडा!

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मोठा खर्च 

पुणे - महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने विकासकामांवर परिणाम झाला असतानाच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी दरमहिना दीड कोटी रुपयांचा चुराडा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा खर्च केवळ इंधनासाठीचा असून, देखभालदुरुस्ती आणि चालकांच्या वेतनाचा खर्च वेगळाच आहे. 

महापालिकेतील प्रमुख २८ पदाधिकारी आणि ४५ अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक मोटार (कार) देण्यात आली आहे. पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह अतिक्रमण, घनकचरा व व्यवस्थापन, क्षेत्रीय कार्यालये, आकाशचिन्ह आदी खात्यांकडे सुमारे १ हजार १३० वाहने आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या इंधनासाठी महापालिकेचे पेट्रोलपंप असून, वाहनांच्या इंधनासाठी वर्षाकाठी १७ ते २० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. तसेच चालकांच्या पगाराकरिता आठ कोटी रुपये दिले जातात.

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात विविध खात्यांचा निधी कमी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र वाहनांच्या इंधनाची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांचे शहरातील रोजचे कार्यक्रम, दौरे वाढत असल्याने त्यांच्या वाहनांचा खर्च वाढत असल्याचे दिसून, तर अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या फेऱ्या वाढत असल्याचे वाहन विभागाच्या वतीने सांगितले. त्यापाठोपाठ घनकचरा व व्यवस्थापन, अतिक्रमण, पाण्याचे टॅंकर यांच्या फेऱ्या वाढत असून, त्यांच्या इंधनासाठी सर्वाधिक खर्च होत असल्याचे दिसून आले आहे. 

महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या कामाचे स्वरूप जाणून त्यावर होणाऱ्या वाहन खर्चाची माहिती घेतली जाईल. पदाधिकाऱ्यांकडून नाहक खर्च होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच वाहन विभागाचे ऑडिट करून खर्च कमी व्हावा, यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती 

Web Title: pune news 1.5 crore loss for fuel