सहा उपायुक्त, १६ सहायक आयुक्तांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पुणे - महापालिकेतील सहा उपायुक्त आणि १६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी केल्या. 

एकाच झोनमध्ये तीन वर्षे नियुक्ती झाल्याचा निकष लावून या बदल्या केल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुणे - महापालिकेतील सहा उपायुक्त आणि १६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी केल्या. 

एकाच झोनमध्ये तीन वर्षे नियुक्ती झाल्याचा निकष लावून या बदल्या केल्याचे प्रशासनाने सांगितले.

उपायुक्त विजय दहिभाते यांची परिमंडळ एकमध्ये (नगररोड-वडगाव शेरी, येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील) तर, सुनील केसरी यांची परिमंडळ तीनमध्ये (धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर) बदली झाली आहे. विलास कानडे यांच्याकडे परिमंडळ दोनमध्ये (औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता, कोथरूड-बावधन) नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे टेंडर सेल, बीओटी सेल, उपायुक्त विशेष आणि आकाशचिन्ह विभागाचाही कार्यभार सोपविला आहे. 

ज्ञानेश्‍वर मोळक यांच्याकडे परिमंडळ चारमध्ये (हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, कोंढवा-येवलेवाडी), सुरेश जगताप यांच्याकडे परिमंडळ पाचमध्ये (कसबा-विश्रामबागवाडा,भवानी पेठ, बिबवेवाडी) नियुक्ती 
दिली आहे. सतीश कुलकर्णी यांच्याकडे मालमत्ता व व्यवस्थापन विभागासह उपआयुक्त भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचाही कार्यभार सोपविला आहे. 

सहाय्यक आयुक्त जयंतकुमार भोसेकर यांची कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात, नितीन उदास यांची कोंढवा-येवलेवाडी, विजय लांडगे यांची येरवडा-कळस-धानोरी, अविनाश संकपाळ यांची बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, रवी पवार यांची शिवाजीनगर-घोले रस्ता, संदीप कदम यांची औंध-बाणेर, युनूस पठाण यांची धनकवडी-सहकारनगर, माधव देशपांडे यांची कसबा-विश्रामबागवाडा, संध्या गागरे यांची हडपसर-मुंढवा, 
सुनील गायकवाड यांची भवानी पेठ, वसंत पाटील यांची नगर रस्ता (वडगाव शेरी), उमेश माळी यांची सिंहगड रस्ता, संजय गावडे यांची वानवडी-रामटेकडी, अरुण खिलारी यांची ढोले पाटील तर गणेश सोनुने यांची वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात बदली झाली आहे. ॲलिस पोरे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात नियुक्ती झाली आहे. 

सात विभागप्रमुखांच्या बदल्या? 
महापालिकेतील सात विभागप्रमुखांच्या बदल्या दोन-चार दिवसांत होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. 

काही विभागप्रमुख वर्षानुवर्षे एकाच विभागात असून, त्यांच्या बदल्या करणार असल्याचे समजते. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आग्रह धरला आहे. 

Web Title: pune news 16 additional commissioner transfer