पुण्यातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे : दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने आणखी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघेही बांगलादेशातील अन्सरुल बांगला टिम (एबीटी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित आहेत.

पुणे : दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने आणखी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघेही बांगलादेशातील अन्सरुल बांगला टिम (एबीटी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित आहेत.

गेल्या आठवड्यात एटीएसने तीन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या दोन जणांविषयी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एकाला अंबरनाथ येथून आणि दुसऱ्याला महाड येथून ताब्यात घेण्यात आले. हे दोघे एबीटी या संघटनेशी संबंधित असल्याचे आणि त्यांच्या सदस्यांना सहाय्य करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. हे दोघे पुण्यात असणाऱ्या संघटनेच्या सदस्यांना मदत पुरविण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड असल्याचे आढळून आले आहे. हे दोघे जण बांगलादेशातील जैशर या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या दोघांची विशेष न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Pune News 2 Bangladeshi Citizens Arrested In Pune