शिवनेरी बसची दुचाकीला धडक; दोन जणांचा मृत्यू

दिलीप कुऱ्हाडे
सोमवार, 29 जानेवारी 2018

दादर ते पुणे शिवनेरी बसची खडकी येथे दुचाकीला धडक बसली. या अपघातात जाॅर्ज आर्शिवादन ( वय 51,रा. कासारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. आरोक्यदास स्वामी (वय 62, रा.खडकी) यांचा ससूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुणे : जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर खडकी येथे शिवनेरी बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोनजणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर बस चालक संतोष प्रल्हाद मदने (वय 31, रा. सातारा) पळून गेला हाेता. मात्र काही तासानंतर मदने खडकी पोलिस ठाण्यात हजर झाला.

दादर ते पुणे शिवनेरी बसची खडकी येथे दुचाकीला धडक बसली. या अपघातात जाॅर्ज आर्शिवादन ( वय 51,रा. कासारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. आरोक्यदास स्वामी (वय 62, रा.खडकी) यांचा ससूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दिपक सोरटे (वय 54, रा. औंध) यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू अाहे. आर्शिवादन, स्वामी व सोरटे दुचाकीवरून ट्रीपलसीट जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अपघातानंतर चालक मदने बस सोडून पळून गेला. मात्र काही तासानंतर तो पोलिस ठाण्यात हजर झाला.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भोसले करीत आहेत. 

Web Title: Pune news 2 dead in accident