सव्वादोनशे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम; बीडमधील मुलांना मदतीचा हात

पुणे - गेली पाच वर्षे बीडच्या दुष्काळग्रस्त शिरूरकासारमधील विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणाऱ्या येथील निरंजन सेवाभावी संस्थेने यंदा २२२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. 

शिरूरकासार येथील समाजकल्याण वसतिगृह येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, सचिव सचिन मणियार, कार्याध्यक्ष विराज तावरे, नितीन सोनी, आनंद कासट, जगदीश मुंदडा यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक पालकत्व उपक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दगडूलाल बाहेती आणि जेलीयनंट पेन्सिल प्रा. लि. चे मालानी परिवार यांचे विशेष सहकार्य मिळाले. 

बाहेती म्हणाले, ‘‘शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे घेत बौद्धिक क्षमता वाढविण्याचे वय असलेल्या या भागातील चिमुकल्यांना केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी अशा उपक्रमाकरिता पुढे यायला हवे. निरंजन संस्थेच्या शैक्षणिक कार्यासह इतर उपक्रमांकरिता निधी अपुरा पडणार नाही.’’ 

इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी करिष्मा शेख म्हणाली, ‘‘दुष्काळ असल्याने पाणी मिळविण्यासाठी आम्हाला दररोज मोठी कसरत करावी लागते. डोक्‍यावर हंडे घेऊन आम्ही मैत्रिणी पाणी भरण्यासाठी जातो. त्यात आमचा खूप वेळ वाया जातो. आम्हाला शैक्षणिक मदत मिळाल्याने आम्ही नक्कीच भरपूर शिकू आणि मोठे होऊ.’’ विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले. ब्रह्मानंद लाहोटी यांनी आभार मानले.

Web Title: pune news 225 student education