फ्लॅटचा ताबा न देता अडीच कोटींना लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - फ्लॅटचे खरेदीखत करून ताबा न देता बांधकाम व्यावसायिकाने 12 जणांना सुमारे अडीच कोटी रुपयांना लुबाडल्याची घटना विमाननगर परिसरात घडली.

याप्रकरणी नितीन चव्हाण (वय 52, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सुमीत भलोटिया आणि शहाजी उकिरडे या दोघांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भलोटिया याने विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात स्कायमॅक्‍स मॉलमध्ये स्पार्क रिऍलिटी नावाने कार्यालय सुरू केले होते. आरोपींनी डोंगरगाव येथे कंपनीची साइट सुरू असल्याचे दाखवले. तसेच काहीजणांना वाडेबोल्हाई येथे स्पार्क अर्बन ब्लिस हा 25 सदनिकांचा प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी ऑफिसबॉयमार्फत प्रकल्प दाखवून काही नागरिकांचा विश्‍वास संपादन केला. डिसेंबर 2013 मध्ये 12 जणांना हे प्रकल्प दाखवून फ्लॅट आणि प्लॉटचे खरेदीखत करून विक्री केली. फिर्यादी चव्हाण यांच्याकडून 27 लाख 74 हजार रुपये घेतले. तसेच अन्य 11 जणांकडून दोन कोटी सात लाख 25 हजार रुपये घेतले. परंतु त्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित खरेदीदारांनी कार्यालयात चकरा मारूनही टाळाटाळ केली जात होती. वाडेबोल्हाई येथील प्रकल्पही अपूर्ण स्थितीत आहे. काही महिन्यांपासून कार्यालय बंद असल्यामुळे संबंधित नागरिकांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस. बी. खेडकर करत आहेत.

Web Title: pune news 2.5 crore loot

टॅग्स