पुणे जिल्ह्यात ३४ संस्थांना शरद पवार सहकारगौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) येत्या रविवारी (ता. १०) होत असलेल्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात जिल्ह्यातील विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३४ सहकारी संस्थांना शरद पवार सहकारगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातून तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी गुरुवारी पुण्यात या पुरस्कारांची घोषणा केली. 

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) येत्या रविवारी (ता. १०) होत असलेल्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात जिल्ह्यातील विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३४ सहकारी संस्थांना शरद पवार सहकारगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातून तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी गुरुवारी पुण्यात या पुरस्कारांची घोषणा केली. 

प्रत्येकी रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख ७५ हजार आणि ५० हजार रुपये असे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार या वर्षीपासून दरवर्षी दिले जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. 
ते म्हणाले, ‘‘या पुरस्कारासाठी प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, सेवक पगारदार सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका, तसेच सहकारी साखर कारखाने, दूध संघ आणि खरेदी विक्री संघ या तीन संस्थांचा एक संयुक्त गट आणि इतर संस्था असे सहा गट केले आहेत. याशिवाय प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची उलाढालीनुसार तीन स्वतंत्र गटांत विभागणी करण्यात आली. यानुसार एक कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या संस्थांचा एक गट आणि त्यानंतर अनुक्रमे तीन व पाच कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या संस्थांचा प्रत्येकी एक गट तयार करण्यात आला.’’ 

गटनिहाय निवड झालेल्या संस्था

गट १ ः विविध कार्यकारी सेवा सोसायटी- प्रथम- अमरापूर, पिंपळवंडी व नारायणगाव (सर्व तालुका जुन्नर), द्वितीय- आर्वी, गुंजाळवाडी (दोन्ही ता. जुन्नर), पिंपळी (ता. बारामती), तृतीय- वाणेवाडी, मळद (दोन्ही ता. बारामती), ओतूर (ता. जुन्नर) आणि कडूस (ता. खेड). 

गट २ ः नागरी सहकारी पतसंस्था- प्रथम- राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, करंजे (ता.बारामती), द्वितीय- सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था, कोथरूड (पुणे) व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, सासवड (ता. पुरंदर), तृतीय-  बल्लाळेश्‍वर महिला नागरी पतसंस्था, जेजुरी (ता. पुरंदर), मामासाहेब खांडगे पतसंस्था, तळेगाव दाभाडे (ता. मावळ), श्री साईकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, बेल्हे (ता. जुन्नर), चिंतामणी नागरी पतसंस्था, कोथरूड (पुणे). 

गट ३ ः सेवक पगारदार सहकारी पतसंस्था- प्रथम- शिक्षक सहकारी पतसंस्था, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) व मावळ तालुका शिक्षक पतसंस्था, भैरवनाथ दत्तनगर (ता. मावळ), द्वितीय- जिल्हा बॅंक सेवकांची सहकारी पतसंस्था, पुणे, तृतीय- जुन्नर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, जुन्नर, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सेवकांची पतसंस्था, शारदानगर (ता. बारामती), महावितरण कर्मचारी पतसंस्था (ता. मावळ), जिल्हा सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्था, पुणे, गव्हर्न्मेंट प्रिंटिंग प्रेस कर्मचारी पतसंस्था, येरवडा. 

गट ४ ः नागरी सहकारी बॅंका- प्रथम- हवेली सहकारी बॅंक, मोशी (ता. हवेली), द्वितीय- दि बारामती सहकारी बॅंक (ता. बारामती), तृतीय- संत सोपानकाका सहकारी बॅंक, सासवड (ता. पुरंदर). 

गट ५ ः सहकारी साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ ः प्रथम- बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ, द्वितीय- बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, तृतीय- दि माळेगाव सहकारी साखर कारखाना. 

गट ६ ः इतर सहकारी संस्था- प्रथम- भागेश्‍वर सहकारी दूध उत्पादक संघ, वारूळवाडी (ता.जुन्नर), द्वितीय- स्वप्नपूर्ती फेज १ सहकारी गृहरचना सोसायटी, रावेत (ता. हवेली), तृतीय- डॉ. मिनू मेहता अपंगोद्धार सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था, पुणे. 

Web Title: pune news 34 organisation sharad pawar sahkargaurav award