फ्लॅटच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - लष्कर परिसरात चांगला फ्लॅट घेऊन देतो, अशी बतावणी करीत एका व्यक्तीला चौघांनी तब्बल ३८ लाखांना फसविले. या प्रकरणी हमीद शेख (वय ४०, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात व्यक्ती आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख यांना आरोपींनी पुण्यामध्ये चांगला फ्लॅट घेऊन देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी आरटीजीएसद्वारे सुमारे ३८ लाख रुपये एका बॅंक खात्यात जमा करून घेतले. परंतु, फ्लॅट दिला नाही. शेख हे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

एकाला ३० लाखांना गंडा 
तळेगाव येलवाडी येथे जमीन विकसित करून देतो, असे सांगून एका व्यक्तीकडून रोख आणि चेकद्वारे सुमारे ३० लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रशाद शेख (वय ४०, रा. पुणे लष्कर) यांनी फिर्याद दिली. 

त्यानुसार विजय सूर्यवंशी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची तळेगाव येथील येलवाडी येथील जमीन विकसनासाठी २०१४ पासून हा व्यवहार झाला होता. परंतु, आरोपीने त्याच्या पत्नीच्या नावावर पैसे घेऊन, ते परत केले नाहीत. 

सावकाराकडून स्टॅंपचा गैरवापर
सोमवार पेठ येथे खासगी सावकारी करणाऱ्या एका महिलेने व्याजावर पैसे देऊन एका व्यक्तीकडून बळजबरीने दोन कोरे स्टॅंप पेपर आणि एक चेक घेतला. त्यापैकी एका कोऱ्या स्टॅंप पेपरचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नंदकिशोर नरके (वय ५४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन व्यक्ती आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: pune news 38 lakh cheating