तेवीस मतदारसंघांतून 4 हजारांहून जास्त अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रविवारी (ता. 22) विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात 23 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 4 हजार 320 अर्ज नोंदणीसाठी दाखल झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

दिवाळी सुटीच्या काळात निवडणूक विभागाकडून एक दिवसीय विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यात जानेवारी 2018 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांच्या नावांचा मतदार यादीत समावेश केला. तसेच, या मोहिमेत ज्या मतदारांची नावे नाहीत, अशांचीही नावनोंदणी केली. त्यामध्ये नावात बदल, पत्ता बदलणे आणि दुबार मतदारांची नावे वगळणे आदी संदर्भातील एकूण 4 हजार 320 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले.

मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी सर्वाधिक (654) अर्ज पुरंदर मतदारसंघातून आले आहेत. त्याखालोखाल शिरूर विधानसभा मतदारसंघातून 445, इंदापूर 405, बारामती 325, जुन्नर मतदारसंघातून 284, वेल्हा 253, आंबेगाव मतदारसंघातून 242, खेड 158, भोर 185, मावळ 164, चिंचवड 157, खडकवासला 147, हडपसर 130, मुळशी 107, पिंपरी 36, तर सर्वांत कमी 33 अर्ज भोसरी मतदारसंघातून आले आहेत. येत्या 27 ऑक्‍टोबर रोजीदेखील हे विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे मोनिका सिंह यांनी सांगितले आहे.

Web Title: pune news 4000 plus form for voter registration