खासदार शिरोळे यांच्याकडून पीएमपीला सात कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - पीएमपीच्या प्रवाशांसाठी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये 350 बस थांबे उभारण्यासाठी खासदार निधीतून सात कोटी रुपये देण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी बुधवारी जाहीर केले. तसेच पीएमपीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही शिरोळे यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिली.

खासदार शिरोळे, पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी मुंढे यांची भेट घेतली. पीएमपीचे अनेक प्रस्ताव दोन्ही महापालिका, राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन शिरोळे यांनी दिले. विकास आराखड्यात पीएमपीसाठी आरक्षित असलेल्या जागांचा आढावा खासदार शिरोळे यांनी घेतला. तसेच पीएमआरडीएकडून बस पार्किंगसाठी जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. शहर आणि पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या थांब्यांवर शेड नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांना बसचे वेळापत्रक, ऊन-पावसापासून बचाव यासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीचे थांबे उभारण्याची गरज मुंढे यांनी व्यक्त केली. त्याला खासदार शिरोळे यांनी अनुकूल प्रतिसाद दिला. महापालिकेतील प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करणार असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

Web Title: pune news 7 crore fund to pmp by mp anil shirole