आधार कोलमडला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - केंद्र सरकारच्या ‘यूआयडीएआय’ या संकेतस्थळालाच एरर येत असल्याने शहरातील ९३ पैकी केवळ चारच केंद्रांवर आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना ‘आधार’ मिळत नसल्याने ते निराधार झाले आहेत. 

पुणे - केंद्र सरकारच्या ‘यूआयडीएआय’ या संकेतस्थळालाच एरर येत असल्याने शहरातील ९३ पैकी केवळ चारच केंद्रांवर आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना ‘आधार’ मिळत नसल्याने ते निराधार झाले आहेत. 

राज्य सरकारने खासगी एजन्सीला दिलेले आधार नोंदणीचे काम काढून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या नियंत्रणाखाली नोंदणी करण्याची तयारी दर्शविणाऱ्या एजन्सी चालकांना परवानगी द्यावी, अशा सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत १२१ केंद्रांनी नोंदणीची तयारी दर्शविली असून त्यासाठीची सर्व प्रक्रियाही पूर्ण केली आहे. या केंद्रांची मशिन डिॲक्‍टिव्हेट करून त्यामध्ये यूआयडीएआयच्या संकेतस्थळावरून नवीन आधार नोंदणीचे सॉफ्टवेअर लोड करावे लागते; परंतु या वेबसाइटमध्ये तांत्रिक एरर येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात केवळ चारच केंद्र सुरू होऊ शकली आहेत. हा तांत्रिक एरर दूर होऊन लवकरच शहरात ९३ केंद्र सुरू होतील, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

मशिनचा अद्याप पुरवठाच नाही 
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आधार नोंदणीसाठी ३३ मशिन पुरविण्यात येणार होती. परंतु, अद्याप ती देण्यात आलेली नाहीत. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दोन दिवसांपूर्वी क्षेत्रीय कार्यालयात आधार नोंदणी करण्याची सुविधा देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे आज नागरिक क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करीत होते. परंतु, आधार काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी मशिनच आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले. दरम्यान, याबाबत महापालिकेला दोन दिवसांत मशिन देण्यात येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

विवरणपत्र भरायचे कसे? 
आर्थिक विवरणपत्रे भरण्याची अंतिम मुदत तीन दिवसांवर आली आहे. त्यासाठी मुदतवाढ मिळालेली नाही. अशातच आधार दुरुस्ती केंद्रेही सुरू झाली नसल्याने शहरातील नागरिकांची अवस्था दुहेरी कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.

Web Title: pune news aadhar card