"आधार' सेवा पूर्ववत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रे पुन्हा सुरू झाली आहेत. "स्टेट डेटा सेंटर'मध्ये (एसडीसी) तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच, मुख्य सर्व्हरवर आधारची माहिती अपलोड न झाल्याने ही केंद्रे बंद होती. आता नोंदणी आणि दुरुस्तीचे कामकाज पूर्ववत झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 163 आधार केंद्रे आहेत. आधार नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामांची माहिती पाच दिवसांत मुख्य सर्व्हरकडे पाठविली गेली नाही, त्यामुळे सर्व केंद्रांतील काम बंद होते. 

याबाबत तहसीलदार आणि आधारचे समन्वयक विकास भालेराव म्हणाले, ""आधार नोंदणी आणि दुरुस्तीची माहिती मुख्य सर्व्हरवर अपलोड झाली नव्हती. त्यामुळे गेल्या आठवड्यात आधार केंद्रांचे कामकाज ठप्प झाले होते. आता ही सर्व माहिती अपलोड झाली आहे. राज्याच्या एसडीसी यंत्रणेत झालेला बिघाडही दुरुस्त झाला असल्याने सर्व आधार केंद्रांतील सेवा सुरू झाली आहे.''

Web Title: pune news aadhar card