सर्व क्षेत्रीय कार्यालयांत आधार दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

जिल्हा प्रशासनाकडून 7, 8 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम
पुणे - आधार नोंदणी आणि त्यातील दुरुस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी पाच आधार मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निवृत्ती वेतनासह विविध योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. शिवाय आयकर विभागाने देखील पॅन कार्ड "आधार'शी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. परंतु यापूर्वी आधार नोंदणी केलेल्यांच्या कार्डात नाव, पत्ता, जन्मतारीख आणि लिंग यामध्ये चुका झाल्या आहेत. तसेच कार्ड दुरुस्ती केंद्रांची संख्याही अतिशय कमी आहे. परिणामी नागरिकांना कार्डातील दुरुस्तीसाठी वणवण फिरावे लागत आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आधार नोंदणी व कार्डातील दुरुस्तीसाठीची ही विशेष मोहीम येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात, तर 9 व 10 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.

ज्येष्ठांसाठी विशेष सेवा
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी पाच मशिन ठेवण्यात येणार आहे. त्यापैकी एक किंवा दोन मशिन हे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील. बायोमेट्रिक करताना काही अडथळे येत असतील, तर ते देखील तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहेत.

Web Title: pune news aadhar card repairing in all regional office