दहावी परीक्षेसाठी ‘आधार’ अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. त्यामुळे सध्या हा क्रमांक नसेल, तर निकालापर्यंत काढून देण्याचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. त्यामुळे सध्या हा क्रमांक नसेल, तर निकालापर्यंत काढून देण्याचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.

दहावीची परीक्षा मार्च महिन्यात होणार असली, तरी त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, खासगी (बहिःस्थ) विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज माध्यमिक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत, अशी सूचना देताना राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरताना त्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसेल; परंतु त्यांनी आधार नोंदणी केलेली असेल, तर तो नोंदणी क्रमांकदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालापूर्वी आधार क्रमांक काढण्यात येईल, असे हमीपत्र मुख्याध्यापकांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आता आधार क्रमांक काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना धावाधाव करावी लागणार आहे.

प्रमाणपत्रांवर जन्मस्थळ
दहावीच्या प्रमाणपत्रावर आता विद्यार्थ्याच्या जन्माचे ठिकाण नोंदविण्यात येणार आहे. याबाबत शकुंतला काळे म्हणाल्या, ‘‘प्रमाणपत्रावर जन्मठिकाण नोंदविण्याची मागणी होती, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र म्हणून त्याचा वापर करता यावा, यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. परंतु, तसा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.’’

आधार क्रमांक सक्तीचा केला असला, तरी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आधार क्रमांक नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला अर्ज भरणे नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करीत तशा सूचना शाळा आणि त्यांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याची 
अडवणूक होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. परंतु आधार क्रमांक सर्व बाबतीत आवश्‍यक असल्याने मंडळाने अर्ज भरण्यासाठी तो अनिवार्य केला आहे.
- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक
शुल्क प्रकार    माध्यमिक शाळांनी ऑनलाइन    माध्यमिक शाळांनी
                                                                      चलनाद्वारे 

    अर्ज भरण्याची अंतिम तारीख    बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत
नियमित शुल्कासह    ६ नोव्हेंबरपर्यंत    ७ ते १४ नोव्हेंबरपर्यंत
विलंब शुल्कासह    ७ ते १४ नोव्हेंबरपर्यंत    १५ ते २१ नोव्हेंबरपर्यंत

Web Title: pune news aadhar card for ssc exam