पुणे: लवासा घाटात ब्रेक निकामी झाल्याने अपघात

राजेंद्रकृष्ण कापसे 
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

गुजरातमधील एक मिनीबस लवासामध्ये मुक्कामी आली होती. मंगळवारी दुपारी दीड वाजता ती परत जात होती. लवासाहून टेमघर धरणाच्या बाजूचा घाट उतरत होती. टेमघरचे सरपंच महादेव मरगळे यांनी सांगितले की, लव्हार्डे गावाजवळील धरणाच्या बाजूच्या तिसऱ्या वळणावर जाताना बसचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे, बस रस्त्यालगतच्या दगडी संरक्षण कठड्याला धडकली.

खडकवासला : टेमघरमार्गे लवासाकडे जाणाऱ्या घाटात मंगळवारी एका मिनीबसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. झाड व कठड्यात बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

अपघात बसमध्ये 30-35 प्रवाशी होते. काही प्रवाशांना मुका मार लागला आहे. प्रवाशी सुखरूप बाहेर आले. दुसऱ्या मिनीबसने प्रवाशी पुढील प्रवासाला गेले.

गुजरातमधील एक मिनीबस लवासामध्ये मुक्कामी आली होती. मंगळवारी दुपारी दीड वाजता ती परत जात होती. लवासाहून टेमघर धरणाच्या बाजूचा घाट उतरत होती. टेमघरचे सरपंच महादेव मरगळे यांनी सांगितले की, लव्हार्डे गावाजवळील धरणाच्या बाजूच्या तिसऱ्या वळणावर जाताना बसचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे, बस रस्त्यालगतच्या दगडी संरक्षण कठड्याला धडकली. पुढील बाजू झाडाला धडकली. तर मागील चाक जवळ कठड्याचा तुकड्या अडकल्याने बस थांबली. यावेळी बसमध्ये 30- 35लोक होते. नाही तर बस पुढे दरीत गेली असती. 

Web Title: Pune news accident on Lavasa road

टॅग्स