पत्रिका वाटप करण्यासाठी निघालेल्या दांपत्याचा अपघाती मृत्यू

पत्रिका वाटप करण्यासाठी निघालेल्या दांपत्याचा अपघाती मृत्यू

हडपसर (पुणे): मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीवरून निघालेले दांपत्य डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरूळी देवाची येथे गायत्री साडी सेंटर समोर घडला. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस फरारी डंपरचालकाचा शोध घेत आहेत.

वंदना संपत औचरे (वय 52, रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) व संपत रघूनाथ औचरे (वय 60) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दांपत्याचे नाव आहे. याबाबत उमेश भैरवनाथजी गायकवाड (वय 44, रा. वडकी) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजू महानवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी त्यांच्या प्रियांका या मुलीचे लग्न आहे. त्यानिमित्त ते पत्रिका वाटण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. उरूळी देवाची येथील गायत्री साडी सेंटरसमोर आल्यानंतर हडपसरच्या दिशेने जात असताना खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ते दुचाकीवरन खाली पडले. दोघांच्या डोक्यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com