तीन वाहनांना ट्रकची धडक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

वारजे माळवाडी - साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालाने भरलेल्या ट्रकने मोटार व दोन दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला. अखेर तो ट्रक मुठा नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडे नऊ नंतर घडली.

याबाबत, वारजे माळवाडी पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा चालक दारू पिलेला असून त्याने अगोदर एक मोटारीला धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीला धडक देऊन पुढे असलेल्या बुलेट चालकाला धडक दिली. त्यामध्ये बुलेट चालकाच्या पायाला लागले असून त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. त्याला तातडीने वारजे माळवाडीतील खासगी दवाखाण्यात दाखल केले आहे. धडक दिल्यानंतर तो ट्रक पुढे जाऊन नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने तो थांबला. वेळेत थांबला नाही तर मुठा नदीत पडला असता. असे काही नागरिकांनी सांगितले. वारजे वाहतूक पोलीस विभागाचे फोउजदर शिवाजी कोळपे यांनी वाहतूक कोंडी काढली. ही घटना सिंहगड रस्त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यांना माहिती दिली आहे.

Web Title: pune news accident warje malwadi