बलात्कारप्रकरणी आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

पुणे - महिलेबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी महेश केवलकिशन आलुवालिया (वय 42, घोडबंदर रस्ता, ठाणे) याला अटक केली. आरोपीची तीन लग्ने झाल्याची माहिती पुढे आली असून, त्याची न्यायालयाने 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय अविवाहितेने फिर्याद दिली असून, पीडित महिलेला महेशपासून एक मुलगा आहे. आरोपीने या महिलेशी ओळख वाढविली. तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिने मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्यानंतर तिने आरोपीला लग्न कधी करायचे, अशी विचारणा केली, तेव्हा त्याने लग्न करण्याचे टाळून शिवीगाळ करून मारहाण केली.

आरोपीच्या बहिणीने पीडित महिलेकडील सोने काढून घेऊन ते शीतल भाल नावाच्या महिलेच्या नावाने एका खासगी वित्तपुरवठा कंपनीत गहाण ठेवले. पीडित महिलेच्या पैशांतून घेतलेली बुलेट व व्हेस्पा गाड्या काढून घेतल्या. त्याची तीन लग्ने झाल्याची माहिती आरोपी आणि त्याची बहीण, भाल नावाच्या महिलेने लपवून ठेवून फसवणूक केली, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची आहे, वाहने जप्त करायची आहेत, आरोपीची तीन लग्ने झाली आहेत का, सोने कोठे गहाण ठेवले याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: pune news accused arrested in rape case