बेकायदा फलकांवर गुन्हे दाखल करा - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे - शहरात ठिकठिकाणी उभारलेले बेकायदा फलक, बॅनर आणि पोस्टर्स तातडीने काढण्याबरोबरच अशा प्रकारे फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला केली. रस्त्यावरील विशेषत: खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी विक्रेते, टपरी आणि स्टॉलधारकांनी कचरा टाकण्यासाठी कुंड्या न ठेवल्यास संबंधित व्यावसायिकांविरोधातही कारवाई करावी, असेही महापौरांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी अतिरिक्त आयुक्तांसह सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्या वेळी विविध सूचना केल्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील स्वच्छ शहर मोहिमेत "स्वतंत्र ऍप' विकसित केले आहे. त्यानुसार नागरिकांचा प्रतिसाद व तक्रारींवर पालिकेने केलेली कार्यवाही, नागरिकांचा सहभाग यावर चर्चा केली. विविध ठिकाणी रस्ते, पदपथ आणि अन्य कामे सुरू आहेत. त्याचा राडारोडा रस्त्यावर पडल्याचा तक्रारी आहेत. तो तातडीने उचलावा, असेही महापौरांनी सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथ विभाग, सांडपाणी, आकाशचिन्ह विभाग, शिक्षण मंडळ, सर्व उपायुक्तांनी स्वच्छतेसाठी सर्व उपाय तातडीने करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Web Title: pune news action on illegal hoarding Mayor