'बंद'च्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन दक्ष; इंटरनेट बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथे अज्ञात जमावाकडून दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यानंतर परिसरात "जमावबंदी आदेश' लागू करण्यात आला. पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारचा (ता. 4) आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. 

पेरणे, सणसवाडी, वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा येथील परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी जमावबंदी आदेश लागू आहे; तसेच सोशल मीडियावरून अफवा पसरू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनासोबत महसूल विभागातील शिरूरचे प्रांत अधिकारी व तहसीलदारांसह अन्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. कोरेगाव भीमा येथे होणारा आठवडे बाजार या आठवड्यात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडले त्या ठिकाणच्या वित्तहानी आणि मालमत्ता नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. 

अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन 
दरम्यान, बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील "बंद'बाबत दर तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता राखून सहकार्य करावे. शहर व जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: pune news administration is responsible for the ban Internet close