एसटीच्या संपामुळे एजंटांची दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - एसटीच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे शहरातील ट्रव्हॅल कंपन्या आणि त्यांचे एजंट मालामाल झाल्याची माहिती समोर आली आहे. संपामुळे एसटीचे चार कोटींचे नुकसान झाले असले, तरी या काळात खासगी व्यावसायिकांची उलाढाल जवळपास दुपटीने म्हणजे आठ कोटींच्या आसपास झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी वीस ते पंचवीस टक्के म्हणजे सुमारे एक कोटी एकट्या एजंट लोकांच्या खिशात गेली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुणे - एसटीच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे शहरातील ट्रव्हॅल कंपन्या आणि त्यांचे एजंट मालामाल झाल्याची माहिती समोर आली आहे. संपामुळे एसटीचे चार कोटींचे नुकसान झाले असले, तरी या काळात खासगी व्यावसायिकांची उलाढाल जवळपास दुपटीने म्हणजे आठ कोटींच्या आसपास झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी वीस ते पंचवीस टक्के म्हणजे सुमारे एक कोटी एकट्या एजंट लोकांच्या खिशात गेली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. १६) रात्री बारापासून संप पुकारला. ऐन दिवाळीत हा संप सुरू झाल्याने सुटीत गावी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. संप मिटत नाही, हे लक्षात आल्यानंतर परिवहन विभागाने खासगी बस कंपन्यांना साकडे घातले. त्यांनी देखील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गाड्या पुरविल्या. त्यासाठी एसटीच्या तिकीट दरापेक्षा अधिक पैसे आकारण्याची परवानगी दिली. मात्र, त्यानंतर भाड्यावर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. त्यामध्ये एजंट मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याने तिकिटांचे दर दुपट्टीपेक्षा अधिक गेल्याचे पाहवास मिळाले.

पुणे शहरात तीस ते चाळीस ट्रॅव्हल कंपन्या आहेत. त्यांचे मिळून जवळपास ३०० ते ४०० एजंट आहेत. संप काळात कंपन्यांचे बस, स्कूल बस आणि पॅकेज टूरच्या गाड्या खासगी बस एसटीला पुरविण्यात आल्या. मात्र या काळात खासगीबस चालकांच्या अन्य गाड्या या मार्गावरच धावत होत्या. त्यांचे तिकिटाचे दर गगनाला भिडले होते. परंतु एसटी महामंडळाला ज्या खासगी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांची तिकीट विक्री एजंट लोकांनी एसटीचे अधिकारी आणि पोलिस यांच्याशी हात मिळवणी करून हाती घेतली होती. चारशे ते पाचशे रुपये किमतीच्या तिकिटामागे एजंट यांचे शंभर रुपये कमिशन ठरले होते. नंतर हे कमिशनचे रेटही एजंट यांच्याकडून वाढविल्याचे एका खासगी टॅव्हल कंपन्यांकडून नाव न घेण्याच्या बोलीवर सांगितले. मनाला येईल, तितके कमिशन हे एजंट प्रवाशांकडून उकळत होते.अशा प्रकारे संपकाळात सामान्य नागरिकांच्या खिशातून ही लूट करण्यात आली.

तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ
दिवाळीतील गर्दी पाहून दरवर्षी एसटीकडून दहा टक्के भाडेवाढ करण्यात येते. तर ट्रॅव्हल कंपन्यांकडून देखील मोठी भाडेवाढ होते. यामागचे कारण सांगताना एका ट्रॅव्हलचे मालक म्हणाले,  एसटीला दरवर्षी तीन हजार रुपये प्रवासी कर असतो. तोच आमच्या गाड्यांना प्रत्येक सीटमागे साडेसात हजार रुपये वार्षिक कर भरावा लागतो. वर्षभरात होणारा तोटा भरून काढण्याची संधी दिवाळीत असते, म्हणून आम्ही तिकीटदर वाढतो. एसटीला ज्या गाड्या आम्ही पुरविल्या होत्या. त्यांचे दर आम्ही केवळ दहा टक्केच वाढविले होते. परस्पर एजंट लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले.’’

Web Title: pune news agent diwali by st strike