दुर्गप्रेमी मारूती गोळेची आग्रा ते राजगड पदभ्रमण मोहिम

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

ही मोहीम का
शिवसामर्थ्य जगाला कळण्याची गरज आहे. छत्रपतीना आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी स्वराज्याची तळमळ होती. त्यांना सुटका करून येताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल त्याचा किमान एक टक्का तरी अनुभव यावा. आपल्या पूर्वजांचा हा त्याग आपल्या तरुण तरूणींना कळवा. म्हणून हा आव्हानात्मक पदभ्रमणती करण्याचे ठरविले असे ऍड. मारुती गोळे यांनी सांगितले.

खडकवासला : छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेस १७ ऑगस्टला ३५१ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमीत्त आग्र्याहून ज्या मार्गे महाराज राजगडावर पोहोचले होते, त्याच मार्गे दुर्गप्रेमी ऍडव्होकेट मारूती गोळे ही पदभ्रमण मोहीम करणार आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्र परिवार खडकवासला येथील मंदिरात एकवटला होता.

सिंहगड पावित्र्य मोहीम, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, सिंहगडप्रेमी यांनी त्याचा शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन वस्ताद रामभाऊ रायकर, शंकर वांजळे यांच्या हस्ते सत्कार केला. गोळे यांचे वय 39 वर्षे असून त्यांची आतापर्यंत गड किल्लावर विक्रमी भटकंती केली आहे. 

छत्रपतींच्या जीवनातील सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका या दोन घटनाची दखल जागतिक पातळीवर इंग्रजी दैनिकाने घेतली आहे. आग्र्याहून सुटका या घटनेच्या 300व्या वर्षी मी नव्हतो, 400व्या वर्षी मी असलो तरी मला चालता येणार नाही. म्हणून मी यावर्षी जाण्याचे ठरविले. त्याचबरोबर येसूबाई व छत्रपती राजाराम यांच्या दुसऱ्या पत्नी जानकीबाई या परत स्वराज्यात आल्या नाहीत. त्या दिल्लीत बंदिस्त असताना त्यांचा मृत्यू झाला. 

60 दिवसांची पायपीट 
आग्रा ते राजगड यासाठी उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सुमारे दीड हजार किलोमीटरचा पायी प्रवास होणार आहे. याला किमान 60 दिवस वेळ लागणार आहे. या मोहिमेसाठी मागील चार महिन्यापासून तयारी करीत आहे. त्यानिमित्ताने मी पुण्याहून सिंहगड, पानशेत, शिरवळ, तळेगाव, दिवेघाट अशी रस्तावरील सुमारे 600 किलिमिटरची पायपीट केली आहे. त्यांच्या बरोबर अनिल ठेंबेकार(वय50), मनोज शेळके(वय 53) हे सहकारी आहेत. 

या कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड पावित्र्य मोहिमेचे नंदकिशोर मते, विजय कोल्हे, महेश मोकाशी, सुधीर धावडे, गोकुळ करंजावणे, नितीन वाघ, संतोष गोपाळ राजेंद्र कापसे, यांनी केले होते. 

कार्यक्रमाला समीर जाधवराव, महेंद्र दांगट, , रामचंद्र धावडे, मिलिंद इंगवले, गणेश गायकवाड, सुधीर धावडे, सागर मते, विनायक दारवटकर, मंदार मते, हरीश मते महेश मते, ज्ञानेश्वर समगिर, जय मते, प्रा. सुनील मते, अमर मते आदिनाथ मते, विकास दांगट, किशोर माने, शिवधीन संघटनेचे अध्यक्ष आशुतोष देशमुख, ओंकार कोल्हे, स्वप्नील वाघ, गोळे यांच्या पत्नी स्वाती गोळे, भाऊ पोपट गोळे, पुष्पा गोळे, सुवर्णा गव्हाणे, नीलिमा धावडे यावेळी उपस्थित होते. 

ही मोहीम का
शिवसामर्थ्य जगाला कळण्याची गरज आहे. छत्रपतीना आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी स्वराज्याची तळमळ होती. त्यांना सुटका करून येताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल त्याचा किमान एक टक्का तरी अनुभव यावा. आपल्या पूर्वजांचा हा त्याग आपल्या तरुण तरूणींना कळवा. म्हणून हा आव्हानात्मक पदभ्रमणती करण्याचे ठरविले असे ऍड. मारुती गोळे यांनी सांगितले.

गोळेची  विक्रमी भटकंती
*२०१२ पासून राज्य, परराज्यातील 513 किलल्यावर पायी चढून भटकंती. 
*सिंहगड - राजगड- तोरणा - लिंगाणा- रायगड असे ५ गड एकाच दिवशी १६ तास ५५ मि. या वेळेत पदभ्रमण केले.
*सिंहगड आतापर्यंत 229 वेळा गडावर गेलो आहे. ३४ मिनिटात सिंहगडसर करतो.
*अनेक आडवाटेवरच्या अपरिचीत-गुहा मंदिरांची भटकंती त्यांनी केली आहे. 
*सिंधदुर्ग मधील मनसंतोषगडावर पहिला दुर्ग अभ्यासक म्हणून पोचलो.
*मनमाड मधील गोरखगडचा माथा, कर्जत जवळील मच्छिन्द्रगड, गडचिरोलीतील टीपागड दुर्गअभ्यासक, भटकंती करणारे, शिवप्रेमी, यांच्यापासून दूर असलेल्या या गडावर गोळे पोचले आहेत.

Web Title: Pune news agra to pune walking