आग्रा ते राजगड पदमोहिमेतील शिलेदारांचे स्वागत

Agra to Rajgad
Agra to Rajgad

मंचर : सतराव्या शतकात आग्र्याहून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहचले. त्यांचा हा प्रवास अचंबित करणारा ठरला. आग्रा सुटकेस १७ ऑगस्टला ३५१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमिताने आग्र्याहून ज्या मार्गे महाराज राजगडावर पोहचले होते त्याच मार्गे पुण्यातील दुर्गा प्रेमी मारुती गोळे (वय ३९), अनिल ठेबेकर (वय ५०), मनोज शेळके (वय ५३) यांनी पदमोहीम राबविली. या तीन शिलेदारांचे आगमन प्रसंगी त्यांचे मंचर व अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.१५) जंगी स्वागत करण्यात आले. राजगडावर खासदार संभाजी राजे महाराज यांच्या उपस्थितीत (सोमवारी) पद मोहिमेचा सांगता समारंभ होणार आहे.   

महाराजांची सुटका झाल्यानंतर त्यांना कोणत्या अडचणीना सामना करावा लागला असेल तसेच शिवरायांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती तरुण पिढीला व्हावी या उदेशाने पायी प्रवासाचा निर्णय घेतला. असे गोळे यांनी सांगितले. ते म्हणाले “ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे संभाजी पॅलेस मध्ये झालले स्वागत पाहून आमचा आनंद द्विगणित झाला. सरदार कानोजी आंग्रे यांचे वंशज तसेच होळकर, शिंदे, पवार घराण्याचे वंशज तेथे हजर होते. आमच्या पद्मोहीमेचे त्यांनी स्वागत करून सुभेचा दिल्या. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश असा प्रवास केल्यानंतर महाराष्ट्रात २५ व्या दिवशी पळसनेर (ता. शिरपूर जिल्हा. धुळे) गावात ८ सप्टेंबर रोजी प्रवेश केला.

शिरपूर, कोपरगाव, संगमनेर, नारायणगाव येथे गावकरी विध्यार्थ्यानी स्वागत केले. संपूर्ण प्रवासात आतापर्यंत ३० ठिकाणी व्याख्याने झाली. शिवरायांचा इतिहास सांगितला. दररोज सरासरी ३५ ते चाळीस किलोमीटर चे अंतर पार केले. काही प्रवासात पावसाचाही सामना करावा लागला. शिवप्रेमींनी जेवण व नास्थ्याची व निवासाची व्यवस्था केली.” 

एक हजार एकशे पंधरा किलोमिटरचा पायी प्रवास केल्यानंतर अवसरी खुर्द येथे शिलेदारांचे आगमन झाले. सरपंच सुनिता प्रसाद कराळे, माजी उपसरपंच निलेश टेमकर , मंचर रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रशांत अभंग, यतीन कुलकर्णी, वनिता अभंग, कमल ठेबेकर यांच्या सह गावकर्यांनी शिलेदारांचे स्वागत केले. गोळे यांनी प्रवासातील अनुभव व शिवरायांचा आग्रा ते रायगड प्रवासाची सविस्तर माहिती उपस्तिथाना दिली. शनिवारी (ता. १६) सकाळी काळभैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर शिलेदार राजगुरुनगर कडे मार्गस्थ झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com