आग्रा ते राजगड मोहिमेतील तीन मावळ्यांचे जंगी स्वागत

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

शिवरायांचा त्रास अनुभवण्याच्या प्रयत्न
शिवसामर्थ्य तरुणांना कळण्यासाठी त्या तिघांनी ही मोहिल केली आहे. शिवरायांना येणासाठी किती त्रास झाला असेल तो अनुभवायचा होता. आग्र्याहून सुटका ही छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. तशी त्यावेळच्या ब्रिटिश वृत्तपत्राणे दखल घेतली आहे. 

खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराज यांची सुवर्ण अक्षराने नोंद असलेली "आग्र्याहून सुटका" या ऐतिहासिक घटनेच्या 351व्या वर्षानिमित्त पुण्यातील तीन मावळे आग्र्याहून चालत राजगडावर निघाले असून ते पुण्यात आले असता त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. राजगडावर आज सोमवारी पोचल्यावर मोहीम फत्ते होणार.

आज ते मुक्कामी पाबे खिंडीत आहे तर उद्या सोमवारी सकाळी ते राजगडला पोचल्यानंतर मोहिम समाप्त होणार आहे. या मोहिमेचे प्रमुख व पायदळाचे प्रमुख पिळजीराव गोळे यांचे वंशज ऍड मारुती गोळे आहेत त्याच्या समवेत अनिल ठेंबेकर, मनोज शेळके असे हे तिघेजण 17 ऑगस्ट पासून म्हणजे 34दिवसात सुमारे दीड हजार किलोमीटर अंतर पार केले आहे. 

आग्र्याहून चालत येताना ऊन वारा पावसाचा सामना करावा लागल्याने काही वेळ थांबावे लागले. राजगडावरील माती आग्ऱ्याला नेली. तेथे झाड लावण्यात आले तर आग्र्याची माती आणून राजगडावर त्या मातीत झाड लावनार आहे. या प्रवासात उत्तर प्रदेश, राजस्थान मध्य प्रदेश व महाराष्ट्र असा चार राज्यातील प्रवास झाला. या रस्त्यावर असणाऱ्या गावातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली घराण्यातील लोकांनी आदरपूर्वक स्वागत केले. 

शिवरायांचा त्रास अनुभवण्याच्या प्रयत्न
शिवसामर्थ्य तरुणांना कळण्यासाठी त्या तिघांनी ही मोहिल केली आहे. शिवरायांना येणासाठी किती त्रास झाला असेल तो अनुभवायचा होता. आग्र्याहून सुटका ही छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. तशी त्यावेळच्या ब्रिटिश वृत्तपत्राणे दखल घेतली आहे. 

आता दक्षिणेतील मोहिमेवर
आता पर्यंत राज्यातील, परदेशातील 513 गडकोटांवर अभ्यास मोहीम केल्या. येत्या दोन वर्षात दक्षिणेतील गडकोटांना भेट देणार आहे. अशी नवीन माहिती यावेळी ऍड गोळे यांनी दिली.

Web Title: Pune news Agra to Rajgad on walk