विमानतळावर नोकरी... सावध राहा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - लोहगाव विमानतळावर नोकरीच्या संधी आहेत, असे भासविणाऱ्या जाहिराती बनावट आहेत. त्यापासून सावध राहण्याचे आवाहन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून केले आहे. 

पुणे - लोहगाव विमानतळावर नोकरीच्या संधी आहेत, असे भासविणाऱ्या जाहिराती बनावट आहेत. त्यापासून सावध राहण्याचे आवाहन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून केले आहे. 

शहरातील दोन वृत्तपत्रांत नुकत्याच दोन जाहिराती आल्या. त्यात पदवीधर युवक- युवतींना विमानतळावर नोकरीच्या संधी, अशा आशयाची जाहिरात आली होती. त्यातील दूरध्वनी क्रमांकावर उमेदवारांनी संपर्क साधला असता, पूजा रावत या युवतीने फोन उचलला. नोंदणीसाठी दीड हजार रुपये बॅंकेत भरण्यास सांगितले. त्यानंतर दूरध्वनीवरच मुलाखत घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर दूरध्वनीवर झालेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना जुजबी प्रश्‍न विचारण्यात येतात. त्यातून मुलाखत उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात येते. नियुक्तिपत्र आणि करारासाठी १५ हजार रुपये एका बॅंकेत भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही उमेदवारांनी पैसे भरले होते; परंतु त्यांना मिळालेले नियुक्तिपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रशासनाने त्यांना पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले आहे.

विमानतळावर कोणत्याही प्रकारची नोकरी सध्या उपलब्ध नाही. नोकऱ्या असतील तर त्या बाबतची माहिती  www.aai.aero  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. 
- अजयकुमार, संचालक, लोहगाव विमानतळ

Web Title: pune news airport job alert