एआयटी ‘आकृती’ला प्रतिसाद

एआयटी (दिघी) - आकृती महोत्सवात डीआरडीओच्या वतीने आयोजित प्रदर्शनात लष्करासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली.
एआयटी (दिघी) - आकृती महोत्सवात डीआरडीओच्या वतीने आयोजित प्रदर्शनात लष्करासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली.

पुणे - मेकॅनिकल इव्हेंट्‌सपासून रोबोटिक्‍सपर्यंत विविध तांत्रिक उपक्रमांचा सहभाग असलेल्या ‘आकृती’ महोत्सवास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एआयटी) दिघी कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍निकल बोर्डातर्फे ‘आकृती’ हा महोत्सव आयोजिला होता. आठवडाभर रंगलेला हा महोत्सव तांत्रिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी नटलेला होता. तांत्रिक आकृती हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धात्मक उपक्रम असून, यात टेक्‍निकल चषकासाठी ‘एआयटी’च्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली. कोड रेड आणि ब्लाइंड कोडिंग, एनएएनडी इट आणि पीसीबी डिझायनिंगसारखे इलेक्‍ट्रॉनिक्‍सशी संबंधित इव्हेंट्‌स, कॉण्ट्राप्शन आणि ऑटोकॅडसारख्या मेकॅनिकल इव्हेंट्‌सपासून रोबोटिक्‍सपर्यंतच्या अनेक तांत्रिक इव्हेंट्‌समुळे या महोत्सवात विद्यार्थ्यांचे कौशल्य पणास लागले.

आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सव ‘सोल्युशन्स २०१८’ हा एआयटीतर्फे आयोजित केलेला दुसरा इव्हेंट आहे. ‘भारत- विकसनशीलतेकडून विकसित होण्याकडे’ या थीमवर हा उपक्रम आधारित होता. संगणक, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल, रोबोटिक्‍स, गेमिंग आणि पेपर प्रेझेंटेशन या विभागांमध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवातील ३५ इव्हेंट्‌समध्ये २१ शिक्षण संस्थांतील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुयोग्य व सशक्त स्पर्धात्मक दृष्टिकोनासह सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, व्हीआयआयटी आणि एमआयटीसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत झाली. यातील रोबोटिक्‍स इव्हेंट्‌समध्ये सीएमई आणि एनडीएच्या स्पर्धक संघांनी सहभागी होऊन स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावला.

‘डीआरडीओ’चे (डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) सहसंचालक आलोक मुखर्जी यांच्यातर्फे आयोजित केलेले ‘डीआरडीओ प्रदर्शन’ हे या महोत्सवातील मुख्य आकर्षण होते. क्षेपणास्त्रे आणि रणगाड्यांसारख्या विविध शस्त्रांची मॉडेल्स या वेळी सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com