राज्यकर्त्यांची कर्जमाफी म्हणजे गाजर: अजित पवार

संतोष आटोळे 
रविवार, 27 ऑगस्ट 2017

आमदार हप्ते घेतात ?
यावेळी ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी करुनही गावात दारुबंदी होत नसल्याबाबत तसेच कटफळ मध्ये दारुवाले कसा त्रास देतात हे सांगताना एकाचवेळी अनेकजण सांगत असल्याने हवालदारला हफ्ता घेतात असे ऐकण्याऐवजी आमदाराला दारुवाले हफ्ता देतात हे ऐकल्याने हफ्ता कोणत्या आमदाराला हफ्ता  देतात हे अजित पवारांनी विचारले यावेळी एकच हशा पिकला तेव्हा ग्रामस्थांनी आमदार नव्हे तर हवालदार असे सांगिल्यावर पोलीस अधीक्षक यांना घेवुनच दारूचा उद्योग बघायला घेऊन येतो असे सांगत ग्रामस्थांच्या तक्रारीचा निपटारा केला.

शिर्सुफळ : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयाने शेतकरी, उद्योजक आदी सर्व वर्ग आर्थिक संकटात पाडला असुन अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच कर्जमाफी हि केवळ गाजर दाखविण्या सारखे केले यामध्ये सध्या लाभापेक्षा त्रास अधिक असुन यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

कटफळ (ता.बारामती) येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पवार बोलत होते.यावेळी बोलताना पवार यांनी राज्यसरकारच्या कामकाजावर टिका करीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील अनेक उद्योगांना आपली उत्पादन क्षमता कमी करावी लागत आहे.यामुळे अनेक लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड येणार आहे.तसेच सरकार कडुन जाहिर करण्यात आलेली कर्जमाफी हे एक गाजर असुन पूर्वी शरद पवारसाहेब कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी एक झटक्यात मंजुर करण्यात आली होती. आता मात्र निकषांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असुन यामुळे जिल्हातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सभासदांना फक्त 350 कोटींचा लाभ मिळणार आहे. जर या निकषांमध्ये बदल केला तर तो आकडा सतराशे कोटी पर्यत जाईल याबाबत सरकार कडे पाठपुरावा करु.

तसेच आगामी काळामध्ये बारामती येथील रेल्वे स्टेशन बंद करुन ते कटफळ परिसरात होणार असुन तेथुन रेल्वेच्या माध्यमातुन बारामतीहे शेवटचे स्टेशन न होता देशातील सर्व स्टेशनला जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामुळे कटफळ चे महत्व वाढणार आहे त्या मुळे जमिनी विकू नका त्याचे जतन करा व पुढील पिढी साठी तरतूद करा असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार,सरपंच किर्ती मोकाशी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आमदार हप्ते घेतात ?
यावेळी ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी करुनही गावात दारुबंदी होत नसल्याबाबत तसेच कटफळ मध्ये दारुवाले कसा त्रास देतात हे सांगताना एकाचवेळी अनेकजण सांगत असल्याने हवालदारला हफ्ता घेतात असे ऐकण्याऐवजी आमदाराला दारुवाले हफ्ता देतात हे ऐकल्याने हफ्ता कोणत्या आमदाराला हफ्ता  देतात हे अजित पवारांनी विचारले यावेळी एकच हशा पिकला तेव्हा ग्रामस्थांनी आमदार नव्हे तर हवालदार असे सांगिल्यावर पोलीस अधीक्षक यांना घेवुनच दारूचा उद्योग बघायला घेऊन येतो असे सांगत ग्रामस्थांच्या तक्रारीचा निपटारा केला.

Web Title: Pune news Ajit Pawar criticize Devendra Fadnavis government