प्रेमसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्नीला ढकलून देऊन केला खून

विलास काटे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

फ्लॅटचे बांधकाम पाहण्यासाठी गेले. मात्र तेथे कुलूप असूनही कुणाची परवानगी न घेता प्रवेश केला. आणि सर्वजण पाचव्या मजल्यावर गेले. नंतर पुन्हा खाली येताना पत्नीला देविदासने ढकलून दिले. डोक्यावर पडल्याने पालवे यांनी गंभीर दुखापत झाली.

आळंदी : लग्नानंतरच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाला अडथळा ठरणाऱ्या पहिल्या पत्नीला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन आळंदीजवळील चऱ्होली खुर्दच्या एका बांधकामावरून ढकलून दिले. यामध्ये अहमदनगरच्या मंदा देविदास पालवे (वय २८) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पतीसह दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मयत मंदा पालवे यांचा भाऊ आदिनाथ गोरक्ष खेडकर (रा. चिंचपूरी हिझवे, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संगनमताने कट रचून खून केल्याचा गुन्हा आरोपी देवीदास तुकाराम पालवे आणि घुले या दोघांसह एका अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला. आरोपी देविदास पालवे आणि मयत पालवे हे नगर जिल्ह्यातील पती-पत्नी असून, देविदास याचे बाहेरील महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची कुणकुण पत्नी मंदा हिला लागल्याने त्यांच्यात सतत भांडण होत होते.

मयत पालवे या अलीकडे माहेरी राहत होत्या. आरोपीने मंदा पालवे यांना आळंदीला फ्लॅट घेऊन राहू असे सांगून त्यांच्या माहेरून आळंदीत आणले. आळंदीजवळील चऱ्होली खुर्दच्या एका सोसायटीत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे पालवे पतीपत्नी आणि त्यांची दोन मुले शुक्रवारी (ता. २६) मुक्कामी राहिले. त्यानंतर दोघांनीही चऱ्होलीतील नातेवाईकांच्या सोसायटीजवळच नवीन बांधकाम सुरू होते. तेथे फ्लॅटचे बांधकाम पाहण्यासाठी गेले. मात्र तेथे कुलूप असूनही कुणाची परवानगी न घेता प्रवेश केला. आणि सर्वजण पाचव्या मजल्यावर गेले. नंतर पुन्हा खाली येताना पत्नीला देविदासने ढकलून दिले. डोक्यावर पडल्याने पालवे यांनी गंभीर दुखापत झाली. यावर पाय घसरून पडली असा बहाणा आरोपी देविदास केला. आणि जखमी पत्नीला उपचारासाठी भोसरीतली खासगी रूग्णालयात नेले. मात्र तेथे पोचल्यावर पालवे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज आदिनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी देविदास पालवे आणि घुले यांनी अटक केली. तर अल्पवयिन आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news alandi man murders wife for extramarital affair