गैरहजर विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दबावापुढे माघार घेत विद्यापीठाने त्यांना परीक्षेस बसू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी आता जादा तासिका घेण्यात येणार असून, त्याला हजेरी लावल्यास परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे.

मराठी विभागातील एमए अभ्यासक्रमाचे सुमारे दहा विद्यार्थी वर्गात नेहमी गैरहजर होते. परीक्षेला आवश्‍यक असलेली वर्गातील 75 टक्के हजेरी भरली नाही. त्यामुळे त्यांना तिसऱ्या सत्राच्या परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यावर विद्यार्थ्यांनी चूक झाल्याचे लेखी दिले, तसेच शिक्षण संचालकांकडेही तक्रार केली होती. या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या मागणी आणि अन्य घडमोडीमुळे अखेर प्रशासनाने माघार घेत काही अटींसह या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्याचा निर्णय घेतला आहे. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, ""विद्यार्थ्यांनी अतिरिक्त तासांना बसून, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची लेखी म्हणणे मांडले आहे. ते मान्य करण्यात आले. जानेवारीत त्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. तो पूर्ण केल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना फेब्रुवारीत परीक्षेला बसू दिले जाणार आहे.''

Web Title: pune news Allow the absent students to sit for the exam