अमर्त्य देशमुखची ‘एनडीए’त निवड

अमर्त्य देशमुखची ‘एनडीए’त निवड

पुणे - दत्तवाडी येथील अमर्त्य देशमुख याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) जानेवारी २०१८पासून सुरू होणाऱ्या १३९व्या तुकडीसाठी निवड झाली आहे. देशभरातून ३७१ तरुणांची निवड झाली असून, गुणवत्ता यादीत अमर्त्य ३२ व्या स्थानावर झळकला आहे. या प्रशिक्षणानंतर तो भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होईल. 

अमर्त्यचे वडील शरदराव देशमुख हे प्रादेशिक परिवहन विभागात पोलिस निरीक्षक आहेत. त्याची बहीण प्रियेशा २०१६ मध्ये रशियात झालेल्या जागतिक शूटिंग स्पर्धेची (कर्णबधिर विभाग) विश्‍वविजेती आहे. अमर्त्यचे शालेय शिक्षण वडगाव बुद्रुक येथील सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूलमध्ये झाले. पी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजीमध्ये सध्या तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. हवाई दलात जाण्याची स्फूर्ती वडिलांकडून मिळाल्याचे तो सांगतो. एनडीएतील प्रशिक्षणानंतर तो भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होईल आणि त्याचे ‘पायलट’ होण्याचे स्वप्नं पूर्ण होईल, असे ॲपेक्‍स करिअरचे संचालक लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com