...तर उल्हास पवार मुख्यमंत्री असते - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आणि पक्षबांधणीसाठी आयुष्य वेचणारे व्यक्ती म्हणून उल्हास पवार यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस परिवारातील संजय गांधी यांच्या विश्‍वासातील राज्यातील एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनीच पवार यांना मुख्यमंत्री करण्याचीही तयारी केली होती. मात्र काही कारणामुळे ते शक्‍य झाले नाही,’’ असा सुखद गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.   

उल्हास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेमध्ये ‘गझलरंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे यांच्या हस्ते पवार यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, नरेंद्र व्यवहारे, अंकलकोट पाटील उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘उल्हास पवार हे काँग्रेसचे शब्दकोश आहेत. सत्तेपेक्षा त्यांनी पक्षबांधणीला अधिक महत्त्व दिले. असे असतानाही त्यांच्या कष्टाला फळ मिळालेले नाही.’’

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे व उल्हास पवार यांची निस्सीम मैत्री होती. त्यांच्यात कधीही कटुता निर्माण झाली नाही. सध्याची काँग्रेस महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, यांचे विचार विसरत चालली आहे. त्याचीच फळे काँग्रेस सध्या भोगत आहे.’’

Web Title: pune news ... and Ulhas Pawar is the Chief Minister