भात रोपे पाण्यात गेल्याने यंदा आंदर मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान

रामदास वाडेकर
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

या मोकळ्या वावरात पिकवलेले पीक हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.

टाकवे बुद्रुक : ठोकळवाडी धरणाचे पाणी भात खाचरात आल्याने आंदर मावळातील धरणालगतची सगळी भात खाचरे पाण्यात गेली आहेत.  यंदाच्या हंगामात लावलेली भात रोपे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाच्या वर्षाचे नुकसान होत आहे. वास्तविक ही सगळी भात खाचरे टाटा पाॅवरने धरणासाठी संपादित केलेल्या जागेत आहेत. टाटाने तत्कालीन ब्रिटिश सरकारशी करार करून या जमिनी संपादित केल्या आहेत. त्याचा मोबदला ही शेतकऱ्यांना दिला आहे.

या घटनेला शंभर वर्ष होत आली. धरणाच्या पाणी पातळात वाढ झाल्याने ही शेती पाण्यात गेली आहे. धरणा लगतच्या मोकळ्या वावरात शेतकरी पावसाळ्यात भात, हिवाळ्यात व उन्हाळ्यात परसबी, गहू, बाजरीचे पिक घेऊन आपली उपजीविका करीत आहे. या मोकळ्या वावरात पिकवलेले पीक हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मागील पंधरवडयात लावणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मशागत, बी बियाणे, खते आणि मजूरीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

टाटाच्या संपादित जमिनीत वडेश्वर, कांब्रे, बोरवली, डाहूली, खांडी, सावळा, माळेगाव, कुसूर, आदि गावातील शेतकरी पिके काढून उपजीविका करीत आहेत, त्यातच पाणी साचलेल्याचा फटका बसू पाहत आहे. कृषी विभागासह टाटा पाॅवरने सबंधित पिकांचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: pune news andar maval paddy rice crop