मेट्रो प्रकल्पाला गतीसाठी स्वतंत्र बैठक - शिरोळे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - मेट्रो प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी महापालिका, संरक्षण मंत्रालय, रेल्वे, पीएमपी आदी विभागांसोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी गुरुवारी सांगितले. 

पुणे - मेट्रो प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी महापालिका, संरक्षण मंत्रालय, रेल्वे, पीएमपी आदी विभागांसोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी गुरुवारी सांगितले. 

शहरातील मेट्रो प्रकल्पासंदर्भातील विविध अडचणी सोडविण्यासाठी शिरोळे यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी नुकतीच चर्चा केली. या प्रसंगी पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हबबाबत तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून त्यातील अडचणी दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे कर्वे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, ती दूर करण्यासाठी महापालिका अधिकारी आणि वाहतूक विभाग, यांच्यासमवेत पुढील आठवड्यात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचेही खासदार शिरोळे यांनी सांगितले.

Web Title: pune news Anil Shirole metro