अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पुणे - ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका...अण्णा भाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करणारे हजारो कार्यकर्ते...व्याख्यानातून उलगडलेले अण्णा भाऊंचे जीवनकार्य अशा वातावरण मंगळवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सारसबाग जवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर फुलला होता. 

अण्णा भाऊंना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच सारसबागेसमोरील पुतळ्याजवळ हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. अधून-मधून होणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यातही कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून होता. विविध संस्था-संघटना आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी उपस्थिती लावली. विविध सामाजिक संस्थांमार्फत अण्णा भाऊंच्या साहित्यावर आधारित ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. तर काही तरुण-तरुणींनी पत्रक वाटून अण्णा भाऊंचे कार्य लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला.

काही सामाजिक संस्थांकडून अन्नवाटप करण्यात आले. अण्णा भाऊंचे जीवनपट उलगडणारी पुस्तके, की-चेन आणि फ्रेम्स याची विक्री करणारे स्टॉल्सही लावण्यात आले होते. अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रत्येकजण सेल्फी काढण्यात मग्न होता. यानिमित्ताने आयोजिलेल्या अभिवादन सभांमध्ये विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची व्याख्याने झाली. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.  सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती. मिरवणुका येत होत्या आणि त्यातील कार्यकर्ते अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत होते.

अण्णा भाऊ साठे यांना‘भारतरत्न’ द्या
‘‘वंचितांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून करून समता आणि परिवर्तनासाठी जागृती करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे,’’ अशी मागणी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य कला प्रतिष्ठान’चे अध्यक्ष भीमराव पाटोळे यांनी केली. समाजवादी नेते अशोक बहिरट, अशोक शेंडगे, प्रा. विनोद पवार, नरेश धोत्रे, पीटर सोनावणे, प्रभाकर कैरमकोंडा, ओंकार मोरे, लहू जवळकर उपस्थित होते. 

Web Title: pune news anna bhau sathe birth anniversary