अन्नदात्यासाठी ‘अन्नत्याग’ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा स्मृितदिन आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याच्या उद्देशाने ‘एक उपवास अन्नदात्या’साठी हे अांदोलन सोमवारी राज्यभरात झाले. साहेबराव करपे यांचे मूळ गाव असलेल्या चिलगव्हाण येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

पुणे - राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा स्मृितदिन आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याच्या उद्देशाने ‘एक उपवास अन्नदात्या’साठी हे अांदोलन सोमवारी राज्यभरात झाले. साहेबराव करपे यांचे मूळ गाव असलेल्या चिलगव्हाण येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. देशातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली. या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. विदर्भात जनमंच, किसानपुत्र, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, शेतकरी जागर मंच यासह इतरही शेतकरी व सामाजिक संघटनांनी अन्नत्याग आंदोलनात भाग घेतला. पवनार (जि. वर्धा) येथे झालेल्या आंदोलनात अभिजित फाळके, ज्ञानेश वाकुडकर, अमर हबीब आदींचा सहभाग होता. 

नगर येथे सरकारच्या धोरणाचा निषेध करत सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे अन्नत्याग अांदोलन केले. अकोला जिल्ह्यात शेतकरी जागर मंच, लोकजागर परिवार, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अांदोलनात भाग घेतला. 

सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव येथे पाचशे पेक्षा अधिक स्त्री-पुरुष एकत्र येत अांदोलनात सहभागी झाले. नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, कोल्हापूर, सांगली, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातदेखील आंदोलन झाले.

‘आत्महत्येला सरकारचे धोरण कारणीभूत’
‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या सर्व आत्महत्येला केवळ सरकारचे शेतकऱ्यांप्रतीचे चुकीचे धोरण हेच कारण आहे. शासनाला अजून किती शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे? शहरी लोकांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आता गरज आहे. आपण संघटितपणे व्यवस्थेविरुद्ध दोन हात करू, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या वेळी केले.

Web Title: pune news annatyag agitation