मी डोक्‍यावर येऊन बसणार नाही - अनुपम खेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - ""आता माझ्याकडे करायला काही नाही, असे म्हणत "एफटीआयआय'मध्ये सहसा निवृत्त व्यक्ती अध्यक्ष म्हणून येतात; पण मी निवृत्त नाही. "ऍक्‍टिव्ह ऍक्‍टर' आहे. देश-विदेशात फिरून तिथली नाटकं, चित्रपटातील अनुभव मला विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. याचा अर्थ मी कायम संस्थेतच बसून राहणार, असे नाही. मला विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर येऊन बसायचे नाही'', अशा शब्दांत "एफटीआयआय'चे अध्यक्ष अनुपम खेर यांनी मंगळवारी आपली भूमिका मांडली. डोक्‍यावर जाऊन बसणे हे हल्लीच्या पिढीला आवडत नाही, हे मला आवडते, असेही ते म्हणाले. 

विद्यार्थ्यांसोबत बैठक झाल्यानंतर खेर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते. म्हणाले, ""आजच्या पिढीशी कमीत कमी वेळात संवाद साधायला हवा. आपण जास्त बोलायला गेलो तर "हमे बेवकुफ मत समझो' किंवा "भाई एक मिनीट में कहो ना' अशा शब्दांत आपल्याला ऐकवू शकतात. हे आपण आधीच ओळखले पाहिजे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना शिकवत बसायचे, असे करा-तसे करा सांगायचे, हे त्यांना नको वाटते. त्यामुळे मी कायमस्वरूपी संस्थेत बसून राहणार नाही. इथे बसून मला काही तपस्या करायची नाही?'' 

संस्थेचे अध्यक्ष झाला आहात; पण वेळ कसा काढणार, या प्रश्‍नावर खेर म्हणाले, ""माझे आजोबा सांगायचे, "बिझी मॅन' हा सर्व गोष्टींसाठी वेळ काढू शकतो. म्हणून तर मी 508 चित्रपट 33 वर्षांत देश-विदेशांत फिरून करू शकलो. याचा अर्थ एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर वेळ आड येत नाही.'' दोन पिढीत आपल्याला संवादाची दरी जाणवत असते. मग ते घर असेल किंवा एखादी संस्था. ही दरी आपण मिटवली पाहिजे. या संस्थेत मला हेच काम करायचे आहे. त्यासाठी प्रशासन आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुरू आहे. माझा दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांना समजून घेऊन पुढे जाण्याचा आहे. त्यांना मदत करण्याचा आहे. त्यादृष्टीने आम्ही पावलेही टाकली आहेत. माध्यमांमधून संवाद साधण्यापेक्षा मला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायला आवडतो, असेही ते म्हणाले.

Web Title: pune news Anupam Kher