अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’ला भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष व अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी ‘एफटीआयआय’ला भेट दिली. संस्थेमध्ये फेरफटका मारत नवीन कामाचा आढाव घेतला. याबरोबरच विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

मागील वर्षी विद्यार्थी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ‘एफटीआयआय’ची सूत्रे हाती घेतल्यानंतर खेर यांनी पुन्हा एकदा संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला. खेर हे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संस्थेत आले. ‘आपण एफटीआयआयमध्ये आहोत,’ असे त्यांनी ट्विटरवर ट्विट करण्याबरोबरच तेथील व्हिडिओही शेअर केला. त्यानंतर त्यांनी काही वेळ संस्थेचे कामकाज पाहिले. संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅंथोला यांच्या अनुपस्थितीत कुलसचिव वरुण भारद्वाज यांनी खेर यांच्याशी चर्चा केली.  

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेशी संबंधित आपल्या आठवणींना उजाळा दिला, तसेच संस्थेची काही वैशिष्ट्येही सांगितली. संस्थेमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या वर्गखोल्यांच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचीही त्यांनी माहिती घेतली.   

Web Title: pune news Anupam Kher visits FTII