अपेक्षाला उभं करण्यासाठी धडपडताहेत सहकारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

इच्छुकांनी मदतीचा धनादेश रुग्णाच्या नावे (खाते क्रमांक : 20261326877, कस्टमर आयडी : 5515, आयएफएसी कोड : (MAHB0000962) 

बॅंक ऑफ महाराष्ट्र, ब्राह्मणगाव, यवतमाळ येथे पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

पुणे - अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अपेक्षा संजय मुनेश्‍वर ही तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी ती जिद्दीने प्रयत्न करत होती; पण नेमका काळाने घात केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तिचा अपघात झाला असून, त्यात तिचा पाठीचा कणा मोडला आहे. तिला गरज आहे आर्थिक मदतीची... पुन्हा उभारी देण्याची. 

पंचवीसवर्षीय अपेक्षा मूळची यवतमाळ जिल्ह्यातील साखरा गावची (ता. उमरखेड). अपेक्षाचे मातृछत्र लहानपणीच हरपले आहे. पोरीला शिकता यावे म्हणून तिचे वडील दिवसभर शेतात राबतात आणि रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 

तिच्या मणक्‍यास गंभीर दुखापत झाली असून, त्यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यानंतर ती किमान व्हिलचेअरच्या साहाय्याने हालचाल करू शकेल, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. तिच्यावर खेड-शिवापूर येथील श्‍लोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेसाठी किमान सात ते आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, तो तिच्या कुटुंबाला पेलवणारा नाही. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी मदत गोळा करण्यासाठी धडपडत आहेत. 

Web Title: pune news Apeksha MPSC help