सफरचंदासारखी गोड बोरे बाजारात

सफरचंदासारखी गोड बोरे बाजारात

पुणे - रंग हिरवा, आकाराने आवळ्यापेक्षा मोठे व चवीला गोड असलेल्या ‘ॲपल बोरां’चा हंगाम आता सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवडाभरापासून त्यांची आवक सुरू असून मागणीही वाढू लागली आहे. 

चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांची जातीची प्रामुख्याने ओळख असून अलीकडील काही वर्षांत ‘ॲपल बोर’ बाजारात स्थान मिळवू लागली आहे. या बोरामध्ये गर अधिक असल्याने त्यांना नागरिकांची पंसतीही मिळत आहे. घाऊक बाजारात या बोरांना प्रति किलोस १८ ते २२ रुपये इतका भाव मिळत आहे. सोलापूर आणि बारामती भागातून या बोरांची आवक होत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा या बोरांचा हंगाम असतो. हंगामाची सुरवात असल्याने त्याचे भाव तेजी आहेत. डिसेंबर महिन्यानंतर त्याची आवक वाढून भाव कमी होण्याचा अंदाज आहे. 

इतर बोरांमध्ये रविवारी चमेली आणि उमरान बोरांची आवक वाढली आहे. सोलापूर भागातून चमेली आणि उमराण बोरांची सुमारे दोन हजार पोती इतकी आवक झाली. त्यामुळे दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. चण्यामण्या आणि चेकनट या बोरांच्या भावात थोडी वाढ झाली. चमेली बोराच्या प्रति दहा किलोला १२० ते १५० रुपये, उमराण ६० ते ८० रुपये, चेकनेट ५५० ते ५७० रुपये आणि चण्यामण्याला प्रति दहा किलोला ४०० ते ४५० रुपये इतका भाव मिळाला.

किरकोळ विक्रेत्यांकडे ही बोर आली आहेत. ती दिसायला सफरचंदासारखी असल्याने त्यांचे नाव ‘ॲपल बोर’ पडले आहे. आकार आणि रंगामुळे ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्थानिक ग्राहक आणि आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून या बोरांना मागणी जास्त आहे.
- प्रवीण शहा, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com