कलेतून जीवन जगण्याची उमेद मिळते - गिरिजा ओक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘प्रत्येक व्यक्तीचं जगण्याचं साधन कला आहे. कलेमुळे माणसं आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहतात. प्रत्येक व्यक्तीच्या कलेतून जीवन जगण्याची नवी उमेद मिळत असते. ती माणसांना प्रेरणा देण्याचं काम करते. म्हणूनच कलेला कोणत्याही प्रकारचे वय नसते,’’ असे मत अभिनेत्री गिरिजा ओक हिने व्यक्त केले. 

गिरीश धामणे यांच्या ॲबस्ट्रॅक्‍ट चित्र प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी ती बोलत होती. याप्रसंगी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, शास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शनी कर्वे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार अरविंद शाळिग्राम, अभिनेता सिद्धार्थ झाडबुके आदी उपस्थित होते. या वेळी धामणे यांच्या ‘डिव्हाइन एक्‍स्प्रेस’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. प्रदर्शनातून मिळणारी रक्कम विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे. 

रिकाम्या बाटल्या, गाड्यांचे विविध भाग, लाकडाचे तुकडे, प्लॅस्टिक अशा टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या सुंदर वस्तू या प्रदर्शनात होत्या. ॲबस्ट्रॅक्‍ट असणाऱ्या प्रत्येक चित्राच्या माध्यमातून एक सुंदर संदेशही प्रेक्षकांपर्यंत पोचला आहे.

गिरिजा म्हणाली, ‘‘‘तारे जमीन पर’ या चित्रपटावेळी विशेष मुलांकडे पाहून सुरवातीला मला खूप त्रास झाला. का हे असे जीवन या मुलांना मिळाले, असा प्रश्‍न मला नेहमीच पडायचा. मात्र हळूहळू या मुलांच्या सहवासाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. त्यामुळे या विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा मला नेहमीच अभिमान वाटतो. मी स्वतःही या मुलांसाठी जनजागृती करणार आहे.’’

Web Title: pune news art life style girija oak