कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या आजपासून परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पारंपरिक म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून (ता. २०) सुरू होत आहेत. बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षादेखील या वेळापत्रकानुसार सुरू होतील. सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील. 

बहि:स्थ परीक्षेची बैठक व्यवस्था विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्‍यक प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. त्यावर प्रत्येकाच्या परीक्षा केंद्राची माहिती दिलेली आहे. पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात सुरू होतील, असे उपकुलसचिव प्रमोद भडकवाडे यांनी सांगितले.

Web Title: pune news art science commerce exam