वैज्ञानिक खेळण्यांचा जादूगार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनवणारा जादूगार अशी अरविंद गुप्तांची ओळख अनेक शाळांमध्ये आहे. आयआयटी कानपूमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर झाल्यावर त्यांनी काही काळ पुण्यात टेल्को कंपनीत, नंतर होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्रॅम व पुन्हा पुण्यात विज्ञानप्रसारक मुक्त कार्यकर्ता म्हणून तर त्यानंतर काही काळ दिल्ली आणि नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील ‘आयुका’ या संस्थेच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका या संस्थेत अकरा वर्षे काम केले.

या कालावधीत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून, टाकाऊ वस्तूंपासून विज्ञान शिकवणारी खेळणी मोठ्या प्रमाणात तयार केली. ती कशी तयार करावीत, याचे ८,५०० लघुपट तयार करून त्यांनी arvindguptatoys.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले. आजवर हे लघुपट जगभरातील सहा कोटी, तीस लाख लोकांनी पाहिले आहेत. देशात व परदेशात २० भाषांमध्ये ते भाषांतरित करण्यात आले आहेत. या संकेतस्थळावर गुप्ता यांनी जागतिक साहित्यातील गणित, विज्ञान व शांतता या विषयांची गोडी लावू शकणारी ७६,४०० पुस्तकेही उपलब्ध केली आहेत. विज्ञान सोपे करून सांगण्यासाठी त्यांनी स्वतः इंग्रजी व हिंदीत ३० पुस्तके लिहिली आहेत व लहानमोठी ५०० पुस्तके अनुवादित केली आहेत. निरनिराळ्या शाळांमध्ये त्यांनी आतापर्यंत तीन हजार कार्यशाळा घेऊन त्यांतून विद्यार्थी व शिक्षकांना विज्ञानाकडे आकर्षित केले आहे.

माझे कार्य पुण्यानेच घडवले - गुप्ता
‘‘मला मिळालेला हा पुरस्कार खरे तर आपल्या देशातील मुलांना मिळाला आहे, असे मी मानतो. त्यांच्यात ज्ञान मिळवण्यासाठी विलक्षण कुतूहल तर आहेच; पण नवे काही चांगले करून पाहण्यासाठी ही मुले भुकेलेली असतात. तीच माझ्यासाठी प्रेरणेचा मोठा स्रोत आहेत, म्हणून या पुरस्काराचे मोठे समाधान वाटते. पुणे हे माझे प्रेरणास्थान व कर्मभूमी आहे. पुण्यातील समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञांकडून मला सतत स्फूर्ती मिळाली. पुण्यात व त्यातूनही ‘आयुका’तील मुक्तांगण विज्ञानशोधिकेत काम करायची संधी मिळाली व ताकदीचे सहकारी मिळाले, म्हणून मी एवढं काम करू शकलो. माझे कार्य खऱ्या अर्थाने पुण्यानेच घडवले,’’ अशी भावना अरविंद गुप्ता यांनी व्यक्त केली.

Web Title: pune news arvind gupta Padma Shri