"त्या' तरुणीची दोन वर्षांपूर्वी चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - प्रजासत्ताकदिनी काश्‍मीर खोऱ्यात पुण्यातील एका तरुणीकडून आत्मघाती हल्ला करून घातपात घडविण्यात येणार असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणानी दिला आहे. "इसिस'च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून दोन वर्षांपूर्वी याच तरुणीला पुणे येथील दहशतवादी विरोधी (एटीएस) पथकाने ताब्यात घेतले होते. दरम्यान, पुणे पोलिसांनी गुरुवारी घरी जाऊन चौकशी केली असता ती शिक्षणासाठी बाहेर गेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. 

ही तरुणी दोन वर्षांपूर्वी बंडगार्डन रस्ता येथील एका शाळेत शिकत होती. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून "इसिस'च्या संपर्कात आली होती. तिच्या वागणुकीत धार्मिक बदल झाल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना आला. त्या वेळी तिला सीरियामध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. एटीएसच्या पथकाने ती अल्पवयीन असल्यामुळे ताब्यात घेऊन चौकशी केली होती. एटीएसने मौलवीच्या मदतीने तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने आपण त्यांच्या संपर्कात राहणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे ती सुधारल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, ती काश्‍मीर खोऱ्यात असून, तिच्याकडून घातपाताची शक्‍यता असल्याची बातमी अचानक आली. यासंदर्भात पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम म्हणाले, गुप्तचर विभागाकडून याबाबत माहिती मिळाली. त्यावर तिच्या घरी जाऊन चौकशी केली. त्या वेळी ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. ती सध्या कोठे आहे, हे सांगू शकत नसल्याचे तिच्या आईने सांगितले. पोलिसांना तिचा ठावठिकाणा माहीत नाही. 

Web Title: pune news ATS republic day